Chitpavan Connect
April 2025
Chitpavan Connect
Trimonthly e-Magazine, Year 1 | Issue 1
April 2025
Published By: Ganpule Foundation
(c) Ganpule Foundation (Dr. Mrs. Anushree Vaibhav Ganpule)
Reproducing and publishing the contents of this magazine elsewhere without permission of publishers is strictly prohibited.
Images used in this magazine are taken from internet and copyrights of images are owned by respective authors and websites.
Views expressed in the magazine are personal views of authors. Editor / Publishers may not agree with the views expressed.
Published on: Akshay Tritiya (30 Apr 2025)
Table of Contents
ToggleFrom the Desk of Publishers
We are very happy to publish the first ever Chitpavan Connect e-Magazine to unite Chitpavan Members spread across the globe.
Started with just an idea, it has come into a reality.
Lot of people have asked about the primary objective of Chitpavan Youth Forum and Chitpavan Connect e-Magazine.
The objective behind starting Chitpavan Connect is to connect Chitpavans spread across the world and bringing forward all the good work Chitpavans are doing at many places.
We spoke to many Chitpavan members to explain the objective and we have received a very good response from all. Through Chitpavan Connect, we intend to unite Chitpavans for the mutual benefit and empowerment through various initiatives.
Our sincere thanks to all the Pratishthaans who have rendered support to this initiative and allowed us to share links of their magazines for the benefit of all. This is the first step and with encouraging results we are hopeful that Chitpavans will come forward to support each other.
With ongoing happenings in the country, it is not just enough to unite Chitpavans, but whole Hindu community to fight against the evil powers.
Our condolences to the fellow members who lost their lives in tragic Pahalgaam incidence.
Please go through all the articles, links of magazines published by various Chitpavan Pratishthaans, Job Corner and share the details with your known Chitpavans. Also, please send us your suggestions and feedback about improvements to be done and activities to be taken up for the empowerment of fellow Chitpavans.
Vaibhav Ganpule
Founder – Ganpule Foundation
Thane, Maharashtra
Phone: 9920345861
आत्मपरिक्षण
आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती, वैयक्तिक कामात व्यस्त असलेली आढळून येते, परंतु या व्यस्त धावपळीत ही आपल कुटुंब, समाज किंबहुना आपला देश सक्षम घडवायचा असेल तर एकमेव आशेचा किरण दिसतो, “आजचा तरुण वर्ग.” परंतु सत्तरच्या आसपास असलेल्या वयस्कर व्यक्तिना समजा असे म्हणालो की ‘आदर्श व आव्हानं’ पेलण्याच सामर्थ्य आताच्या तरुण पिढीत आहे, किंवा ती सक्षम आहे! या विषयासंदर्भात तुम्ही काय सांगाल? ते सहज म्हणून जातील, “आजच्या तरुणांना सर्वोत्तम काय हे समजत नाही आणि आव्हाने पेलवत नाहीत!” खरचं अशी परिस्थिती आहे का हो?
खर पहायला गेले तर आजची तरुण पिढी, भावी पिढी चे मार्गदर्शक आहेत. आधारस्तंभ आहेत. यामुळे तरुणांनी दूर दृष्टी ठेवत, विचारपूर्वक काही ‘मूलभूत आव्हाने’ स्विकारणे गरजेचे आहे. तरुण वर्गा विषयीचे विचार, तसेच त्यांना देण्यात येणार महत्त्व अंशतः वेगळ आहे. सामाजिक विचारसरणीतून गटवारी ठरवली जाते याच मुख्य कारण कदाचित हे ही असेल की, “आधुनिकतेच्या नावाखाली” तरुण पिढी ‘अपडेट’ होते आहे. विचारांत आणि वागणुकीत बराच बदल जाणवतो आहे.
त्याचबरोबर ‘आपण कोणीतरी वेगळे आहोत अशा भावनांचा आसरा घेत वावरताना दिसतात. तरुणानो बदलत्या काळानुसार स्वतः मध्ये बदल जरुर घडवा, परंतु इतरांना ही त्याचा चांगला उपयोग होतो का हे ही पाहिले पाहिजे. जशा नाण्याच्या दोन बाजू महत्वाच्या आहेत त्याच प्रकारे तरुणांची आवडणारी दुसरी बाजू देखील प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे, “ज्या समाजात आपण वावरतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही जाणीव आज तरुणांना होते आहे!” हे विशेष आहे. मात्र जबाबदारी सांभाळताना काही गोष्टी तरुणांनी लक्षात ठेवाव्यात की, “आपण करत असलेल्या कार्याची दखल कुणी घेवो अथवा न घेवो, भविष्याला याची नोंद निश्चितच घ्यावी लागेल. मित्रांनो! इतिहास हा संदर्भ युक्त वाटत असला तरी तुम्हांला जेव्हा जुन्या इतिहासाची पाने हाताळावीशी वाटतील तेव्हा लक्षात येईल की “पालकांच्या छत्रछायेखाली आपण बऱ्याच प्रमाणात सुखी आहोत. सुखात आहोत.
“वाचा एखाद्या शुर वीर – वीरांगनाची शौर्य गाथा!, वाचा त्यांच समाजाप्रती असलेला देशाभिमान आणि प्रेम!” मेहनती शिवाय सहज साध्य काही मिळत नाही तर त्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि सातत्य अंगी आवश्यक आहे.
मुळात मनुष्य हा सर्वात बुध्दीमान आहेच त्याचबरोबर अनुकरणीय जास्त आहे. मग अशा वेळी वाईट गोष्टींची संगत न करता,’अनुकरण’ चांगल्या कार्याच करा. हे सांगण्याचा मतितार्थ एवढाच की वाईट गुणांच ‘अनुकरण’ नैराश्य देत तर चांगले गुण यशाच्या मार्गात साथीदार होतात. म्हणून भावी पिढीपर्यंत चांगल्या गोष्टी पोहचाव्यात अस मनापासून वाटत असेल तर “स्वतः पासून” सुरुवात करा. आणि हीच आजच्या तरुणाईला संधी आहे. त्याचबरोबर ‘आत्मपरिक्षण’ ही आहे. म्हणजेच काय आपण ज्या दिशेने वाटचाल करत आहोत तो मार्ग चांगला आहे की चुकीचा हे समजून घेणे आवश्यक आहे. बर हे, बर – वाईट ओळखायच म्हणाल तर आपल्या ‘आतील मनात डोकावून बघा’ स्वतः ला सुधारण्याचे उत्तम उपाय सापडतील. योग्य मार्गदर्शन घ्या, त्या मार्गाच योग्य नियोजन करा. तुमच आत्ताच वयोमान काही ही असो कार्य सुरू करा, कारण आयुष्याच मोजमाप करणार साधन अजून तरी आपल्या जवळ उपलब्ध झालेले नाही.
अशावेळी श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच चरित्र वाचा, महाप्रतापी, वीर धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील चढ उतार जाणून घ्या. अवघ्या लहान वयात त्यांनी केलेले महान कार्य, ते देखील समाजाप्रती, राष्ट्राप्रती समर्पित हे लक्षात येईल.
अशा वेळी आपल्या निघून गेलेल्या आयुष्याच उत्तम ‘अवलोकन’ केल तर नक्कीच आपणास अजून जीवन सुधारण्यास मदत होईल. अनेकदा “नियतीने मांडलेल्या डावात एखाद्या बुद्धिबळातील प्याद्या प्रमाणे आपली स्थिती असते परंतु योग्य विचार आणि चांगल्या कृतीला स्विकारले तर, जीवनाचा सारीपाट जिंकण्यास वेळ लागणार नाही. कारण आपले यश हे आपल्या केलेल्या कामावर अवलंबून असते. प्रत्येकात कोणता ना कोणता चांगला गुण असतोच असतो. तो ओळखा, तो गुण आत्मसात करा. इतरांवर दोषारोप करण्यापूर्वी स्वतः ची पारख करा. कदाचित जगाच्या दृष्टीने आदर्श नसालही परंतु आपल्या कुटुंबीयांसाठी आदर्शवत असाल! भावी तरुणांची प्रेरणा असाल.
स्वामी विवेकानंद यांनी केवळ ज्ञान दिलेल नाही तर नैतिकता व वैचारिक प्रवृत्ती या विषयांतर्गत समर्पक विचार दिले आहेत.
या क्षणी साधेपणाने जीवन जगत असलात तरी ध्येय वेडे व्हावे! उच्च विचारसरणी जोपासावी. व्यक्तिमत्वाला पैलू पाडावा. सचोटीने जगाकडे बघावे. काहीतरी समाजपयोगी कार्य करण्याची सदिच्छा असावी. त्या अनुषंगाने कामे करीत यशस्वी व्हावे. हीच प्राथमिकता आपल्या मध्ये निर्माण करुन आव्हाने स्विकारावी. ध्येयवादी बनण्याची ताकद इच्छाशक्तीत निर्माण करावी. मग बघा, “अशक्य गोष्टी देखील, सहजपणे शक्य होत आहेत!” याचा प्रत्यय नक्कीच मिळेल.
ज्या दिवशी ‘ध्येयपूर्तीचा ध्यास तुम्हाला लागेल तेव्हा संकटांना सामोरे जाण्याच बळ वाढेल. आकाशाला गवसणी घालण्याच सामर्थ्य निर्माण होईल. पण त्याची सुरुवात स्वतः कडून होऊ द्याल तेव्हा हळूहळू कुटुंबापासून पुढे समाजापर्यंत पोहचाल. तेव्हा अनुभवाल की ‘यश नक्की काय असत!’
कोणत्याही परिस्थितीत ‘मोहजालात’ गुरफटू नका’, असाल तर आतापासून स्वतः ला सावरा. वाईट गोष्टीपासून मनाला आवरा. जर आपणास चांगल्या गोष्टी येत असतील, त्यात प्रवीण असाल तर त्या इतर तरुणांना सांगा, शिक्षित करा. चांगल्या गोष्टीतून ‘संघटीत’ व्हा. मग बघा “आव्हाने पेलण्याची ‘सक्षमता’ प्रत्येक तरुणांमध्ये दिसून येईल” आणि हेच आपल्या प्रगतिच पहिल पाऊल असेल. स्वीकारलेल्या कार्याचा पहिला टप्पा असेल. बरोबरीचा एखाद्याला नैराश्यातून बाहेर काढत त्याच्या मनाला ‘परमशक्तित’ आणण्याच सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल. आजचा सुशिक्षित तरुण वर्ग ‘व्यवसाय- नोकरी’ नसल्याने हताश होताना दिसतो, त्यांना सकारात्मक विचारांची साथ द्या. त्यांच्या मनात ‘जिद्द’ निर्माण करा. चांगल काय वाईट काय याच शिक्षण व अनुभवाची सांगड घालत योग्य मार्गावर आणा.
“नोकरी म्हणजेच जीवन” असा विचार चुकीचा हे त्यांना पटवून देऊन “जीवनमान उंचावण्यास अनेक चांगले मार्ग आहेत!” याची जाणीव करून द्या. मग बघा ती व्यक्ती विचारानी किती प्रगल्भ होईल.
जाता जाता प्रत्येकासाठी, काम कोणतही असो. लहान असो अथवा मोठ “मी एकटा/ एकटी कस काय करू? हा विचारच आधी मनातून काढून टाका. “शंभर पावल चालायच आहे तर पहील पाऊल दणकट टाका” कारण शंभराव्या पावलाच्या तुलनेत त्या दिशेने उचलेल पहील पाऊल महत्त्वाचे असेल. आता हे स्वतः साठी झाल. समाजासाठी कार्य करताना प्रत्येकाचा हातभार महत्त्वाचा आहे. त्यासाठी फक्त मीच का? असे न म्हणता प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखले तर कर्तव्यपूर्तीस वेळ लागणार नाही. आणि युवा मित्रांनो खर सांगते “ही जिद्द तुमच्या प्रत्येकात आहे!” बरोबर आहे ना!!
स्वतः ला ओळखा, ध्येयाच्या ‘परिसाला’ जवळ बाळगा, स्वप्न नगरीतून बाहेर पडा व निरंतर मेहनतीने यशाच्या मार्गाने चालत विजयी व्हा! यशस्वी व्हा!
सौ आरती मोने
सत्तरी, साखळी, गोवा
फोन: 7038062536
छाया प्रकाशाचा खेळ
Hobbies are great distractions from the worries and troubles that plague daily living.
एखाद्या गोष्टीचा छंद असणे हे एका जिज्ञासू व सशक्त मनाचे लक्षण आहे. आजूबाजूला बघितले तर अशी छंद जोपासणारी अनेक छंदिष्ट लोक आढळून येतात. काहींना टपाल तिकीट जमविण्याचा छंद असतो तर काही पुरातन नाणी, हस्तलिखित, ऐतिहासिक महत्व असलेली शस्त्र इत्यादींचा संग्रह करून आपला छंद जोपासतात.
माझ्या एका परिचित व्यक्तीला निरनिराळ्या टोप्या जमविण्याचा छंद आहे. आमच्या ऑफिसातील एका सहकाऱ्याकडे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे ‘टाय’ संग्रही आहेत.
मला शालेय जीवनापासूनच छायाचित्रणाचा छंद लागला. झाले असे की, आमच्या घरी टाईम आणि लाईफ मॅगझीन यायची. त्यातील अतिशय अप्रतिम छायाचित्र बघून माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक तीव्र ओढ, आवड उत्पन्न झाली. ‘आपल्याला पण अशी सुंदर छायाचित्र काढता यायला हवीत’, या एकाच धेय्याने मला पछाडले. माझे वडील हे पेशाने जरी डॉक्टर असले तरी ते एक उत्तम छायाचित्रकार होते. त्याकाळात त्यांच्याकडे “याशिका” चा कॅमेरा होता.जो की त्यांचे सर्वस्व होता. सुट्टीत आम्ही फिरायला बाहेर गेलो की तो कॅमेरा ते बरोबर घेत व त्या त्या ठीकाणांचे, निसर्गाचे, वास्तूंचे, महत्व असलेल्या स्थळांचे फोटो काढत. ते फारच अप्रतिम असत. ते पाहून आपल्यालाही असे छायाचित्रण करता आलं पाहिजे हे कुठेतरी मनावर ठसले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी सर जे.जे. कला महाविद्यालयातील मुद्रणकलेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तेथे आम्हाला फोटोग्राफी हा विषय अभ्यासक्रमात होता. तेथे मला छायाचित्रणातील बारकावे शिकायला मिळाले. अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. एक वर्षी आमच्या कॉलेजची शैक्षणिक सहल दक्षिण भारतातील तमिळनाडू व कर्नाटक येथे आयोजित केली होती. मी हट्टाने वडिलांकडे कॅमेऱ्याची मागणी केली. त्यांचा आवडता कॅमेरा मला मिळणे अशक्यप्राय गोष्ट होती. पण माझा एकूणच कल व आवड पाहून त्यांनी त्याकाळात प्रसिद्ध असलेला ‘अग्फा’ या जर्मन कंपनीचा “बनी” हा बॉक्स कॅमेरा माझ्यासाठी विकत आणला. कॅमेरा अतिशय साधा होता. पण, ‘दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने मी माझ्या मनाचे समाधान करून घेतले.
सहल छान पार पडली. चेन्नई (पूवीचे मद्रास), मदुराई, शिवकाशी, उटी, म्हैसूर आणि बँगलोर येथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन आम्ही परत आलो. पहिल्याल्याप्रथम फोटो स्टुडिओ गाठला व बरोबरचे फिल्म रोल्स (आजच्या सारखे डिजिटल तंत्रज्ञानाने विकसित कॅमेरे तेव्हा उपलब्ध नव्हते) डेव्हलप करायला दिले. सर्व फोटो कृष्णधवल रंगातील होते. मुख्य म्हणजे, एक दोन फोटो वगळता बाकी फोटो छानच आले होते. स्टुडिओ च्या मालकानेही त्याचे मत देऊन माझे मनोबल वाढवले. घरी येऊन प्रथम वडिलांना फोटो दाखवले. सर्व फोटो बघून त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी काहीच प्रतिसाद, प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे ते
माझ्याकडे परत दिले. मी मात्र मनातून खट्टू झालो. माझी अपेक्षा होती की फोटो पाहून ते कौतुकाचे चार शब्द तरी बोलतील.
ते कामानिमित्त बाहेर गेल्यावर मी आईला माझे फोटो दाखवले. तिने ते पाहून माझे तोंडभरून कौतुक केले. कोणत्याही पुरस्कारापेक्षा आईने केलेले कौतुक मला श्रेष्ठ वाटले. मन समाधानाने भरून पावले. पण, दोनच दिवसांनी आईने मला सांगितले की, त्यादिवशी तिच्याजवळ वडीलांनी माझ्या फोटोंची तोंडभरून तारीफ केली. मी मात्र उगाचच गैरसमज करून घेतला होता. वडीलांना सर्व प्रकार कळल्यावर ते म्हणाले, ‘तुला त्यादिवशी मी तू काढलेल्या फोटोंवरून प्रतिक्रिया, कौतुक केले असते तर तुला तुझ्या त्रुटी कळल्या नसत्या व तुला फुकाचा अजभमान वाटला असता’. फोटो चांगलेच आले आहेत पण, त्यातही काही सुधारणा होऊ शकते. तुलाही ते अनुभवाने कळेलच म्हणा. वडीलांच्या म्हणण्यात तथ्य होते हे पुढेजाऊन मला कळले. पुढे लंडनला शिक्षणसाठी गेलो असतांना पैशांची बचत करून मी वडीलांच्या परवानगीने पहिला अत्याधुनिक (त्याकाळातील) कॅमेरा विकत घेतला. लंडनमधील वास्तव्यात मी अनेक छायाचित्रण केले.
कालांतराने मी डिजिटल कॅमेरा विकत घेतला. अनेक प्रदर्शनांना भेटी देऊन मी माझा छायाचित्रणाचा छंद जोपासत आलो. दरवर्षीच भरणाऱ्या गुलाब पुष्प प्रदर्शनात मी आवर्जून उपस्थित राहून गुलाबांचे मनाला मोहून टाकणारे फोटो काढले आहेत. आज जवळपास दीड हजार निरनिराळ्या गुलाबांचे फोटो माझ्या संग्रहात आहेत. कोरोना काळाआधी आम्ही अंदमान येथे सहलीला गेलो होतो तेव्हा तेथील निसर्गाची विविध रुप बघून ती कॅमेऱ्यात कैद केली. त्यावेळेस झालेला आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही. सेल्युलर जेल मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीचा फोटो घेताना मन भरून आले. तसेच त्यांच्या हस्ताक्षरातील पत्राचा फोटो घेताना अंग मोहरून आले. मध्यंतरात लंडनला मुलीकडे वास्तवात होतो तेव्हा परत एकदा नव्याने लंडन अनुभवले व त्याचबरोबरीने स्काॅॅटलंड येथील एडीनब्राची सफर अतिशय अविस्मरणीय अशी झाली. ज्याचे सौन्दर्य व्यक्त करतांना शब्द आणि विशेषणे कमी पडतात. अनेक फोटोग्राफी स्पर्धांत मी भाग घेतला आहे. केवळ पारितोषिक मिळावे या हेतूने नव्हे तर इतर छायाचित्रकारांची चित्र बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यातून बरेच काही शिकायला मिळते. समाजमाध्यमावर अनेक फोटोग्राफर चे ग्रुप आहेत. तेथे पण विचारांची देवाणघेवाण करण्यात आगळेच समाधान लाभते. छायाचित्रणाच्या माध्यमातून तुम्ही
संवाद साधत असता, कथा सांगत असता. समोरच्याला छायाचित्रातील आशय सहजगत्या समजणे हे एक उत्कृष्ट छायाचित्रणाचे यश आहे असं म्हटलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. मला हा छाया प्रकाशाचा खेळ नेहमीच आनंददायक अनुभव देतो.
रवींद्र गोडबोले
कल्याण, महाराष्ट्र
फोन: ९८२१७४३५०४
Success Stories 🎖️
Tanuja Deepak Karandikar – Pune
Tanuja successfully completed her B. Sc. (Mathematics) from Sir Parashurambhau College, Pune by securing 86.18% marks.
She has been also awarded with Hardikar Memorial Prize and other college scholarships.
We wish her all the best in her future endeavors.
Avanee Ganpule – Thane
Avanee, studying in 6th Std. secured Bronze Medal and Scholarship in Dr. Homi Bhabha Baal Vaidnyanik Competition held by The Greater Bombay Science Teachers’ Association, Mumbai.
We wish her all the best for further studies.
Swarangi Ravindra Marathe – Goa
Swarangi successfully completed her XIIth Commerce from Shri Shantadurga Higher Secondary School, Bicholim, Goa (Goa Board of Secondary and Higher Secondary Education) by securing 95% marks.
She scored cent per cent (100%) marks in Accountancy and 98% marks in Economics.
We wish her bright future and all the best in her Higher Studies.
पुस्तक परीक्षण: वीरांचा बाणा
भारताचे माननीय प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय शिक्षण नीती २०२० च्या अनुषंगाने युवकांचे सशक्तीकरणाचे उद्दिष्ट घेऊन युवा योजनेचा प्रारंभ करण्यांत आला. या योजनेद्वारे, तीस वर्षाआतील तरुणांच्या लेखन व वाचनाला प्रोत्साहन मिळावे, त्याबरोबर देशांत ग्रंथप्रेम वाढावे व भारत आणि भारतीय लेखनाला विश्व पातळीवर स्थान मिळावे असा विचार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षांत, भारत सरकारच्या प्रेरणेने “आजादी का अमृतमहोत्सव” या कार्यक्रमांतर्गत, केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत २०२१-२२ या वर्षात “राष्ट्रीय पुस्तक न्यास” भारतद्वारा हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘भारतीय स्वातंत्र-आंदोलन’ हा विषय केंद्रीभूत ठेऊन काळाच्या पडद्याआड गेलेले देशभक्त आणि विस्मृतीत गेलेली अनेक स्थळे यांचे स्वातंत्र्यलढ्यातील महत्व लक्षांत आणून देणारी चरित्रे, ललित साहित्य आणि माहितीपूर्ण लेखन या योजनेंतर्गत पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याच्या मालिकेतील हे पुस्तक आहे. बावीस अधिकृत भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये एक देशव्यापी लेखनस्पर्धा आयोजित केली. त्यातील निवडलेल्या ७५ यशस्वी लेखकांमध्ये महाराष्ट्रातून अमरावतीच्या श्री. श्रेयस राजेश कोल्हेकर या तरुणाची निवड झाली. त्यांनी मराठीत एम.ए. ही पदवी प्राप्त केली आहे.
श्री. कोल्हेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे, “वीरांचा बाणा”. भारतीय स्वातंत्र्यसेनानी व राष्ट्रीय नाटककार वीर वामनराव उपाख्य वामन गोपाळ जोशी यांचे संपूर्ण जीवन चरित्र रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. देशस्वातंत्र्यापुढे स्वतःची व कुटुंबाची चिंता न करता, देश स्वातंत्र्यास महत्व देणाऱ्या या महानायकाचा हा जीवन-प्रवास.
“देश-स्वातंत्र्य सर्वोपरी” हाच वीर वामनराव जोशी यांचा बाणा होता. त्यामुळे “वीरांचा बाणा” असे चरित्र ग्रंथाचे शीर्षक लेखकाने दिले आहे. हे लेखकाचे प्रथम, प्रकाशित झालेले पुस्तक आहे.
लेखकाने अनेक जुने ग्रंथ, मासिके, चरित्रे, वामनरावांची नाटकावरील पुस्तके, वर्तमानपत्रे तसेच वामनरावांची सर्वात लहान कन्या मालतीताई जोशी यांची रोजनिशी अशा बऱ्याच दस्तऐवाजांचा अभ्यास करून हे चरित्र लिहिले आहे. त्यांना प्राध्यापिका व लेखिका डॉ. अश्विनी घोंगडे, पुणे ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे जोशी घराण्याचे मूळ गाव. सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असल्यामुळे या गावास संगमेश्वर हे नाव मिळाले आहे. येथील त्यांच्या पूर्वजांपासून सुरुवात करून त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शोकसभेपर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास एकूण अकरा प्रकरणातून आपल्यासमोर येतो. काही महत्वाची छायाचित्रे ह्यांत समाविष्ट केली आहेत. मुखपृष्टावर वामनरावांची झुपकेदार मिशा असलेली रुबाबदार छबी आहे. वामनराव बद्दलचा अभिमान आणि मोठेपणा पुस्तकांत ठायी ठायी जाणवतो. अमरावती शहराचा परिचय आणि अभिमान ही जाणवतो. संपूर्ण “अभ्यास” आणि ‘ध्यास’ घेऊन हे चरित्र लिहिलेले आहे.
वामनराव जोशींनी तारुण्यातच लोकमान्य टिळकांना गुरु मानून, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. जहाल मताचा स्वीकार करून अनेक क्रांतिकारक कार्य उभारणीत वामनराव अग्रेसर असायचे. बॉम्ब बनविण्याचे तंत्रही वामनराव दादांनी आत्मसात केले होते. स्वातंत्रवीर सावरकरांच्या “अभिनव भारत” संघटनेचे वामनराव सभासद होते.
सन १९२० मधे टिळकयुगाचा अस्त झाल्यावर गांधी युगास सुरुवात झाली. लोकमान्य टिळकांनी आपल्या अनुयायांना मृत्युपूर्वी “ यापुढे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात लढा द्यावा” असा संदेश दिला होता. आपल्या गुरूच्या याच आज्ञेचे पालन करीत वामनराव दादा गांधीजींशी एकनिष्टेने जुळले होते. वामनराव दादांनी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रबांधणीचे कार्य सुरु ठेवले. “माझ्यासाठी देशाचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे व ते ज्या मार्गाने साध्य होत असेल, तो मार्ग स्विकारण्यास मी कटिबध्द आहे” अशी विचारधारा ठेवणारे वामनराव आता महात्मा गांधीजींचे एकनिष्ठ शिष्य झाले. जहाल विचार सरणीचे क्रांतिकारक वीर वामनराव दादा आता अहिंसेच्या मार्गाने आपले कार्य चोखपणे बजावू लागले. हा वामनरावांच्या आयुष्यातील दुसरा महत्वाचा पैलू लेखकाने उजागर केला आहे.
स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश शासनात राजद्रोहाची शिक्षा पत्करून चार वेळा तुरुंगवास भोगलेल्या, सर्वस्व पणाला लावलेल्या सुपुत्राची ही शौर्यगाथा आहे. या नायकाचे समग्र जीवन दर्शन ह्या पुस्तकातून होते.
स्वतः दारिद्र्याचे चटके सोसून कायम देशाचा विचार करणारा हा नेता होता. त्यांची नाटके ‘राक्षसी महत्वाकांक्षा’, ‘धर्मसिंहासन’, ‘रणदुंदुभी’, ‘शिलसंन्यास’ वगैरे अतिशय गाजली कारण त्यातून देशप्रेमाचा संदेश दिलेला होता. “रणदुंदुभी” या नाटकातील गीते प्रचंड गाजली. त्या गीतांचे गायन स्वत: श्रेष्ठगायक मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी केले. “ परवशता पाश दैवे ज्याचा” व “जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा” ही दादांच्या लेखणीतून साकारलेली पदे, यामुळे नाटकास विशेष प्रसिद्धी मिळाली. आजही, ही गीते पसंत करणारा मोठा चाहता वर्ग आहे. काही काळ विद्यार्थांच्या मराठीच्या अभ्यासक्रमांत “रणदुंदुभी” नाटकाचा समावेश होता. अमोघ वक्तृत्व आणि खणखणीत आवाजाची देणगी त्यांना लाभली होती. हनुमान शाळेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. दादासाहेब खापर्डे ह्यांचे ते सच्चे अनुयायी होते.
“आले शिरावरी जरी घनघोर घाले,
दारिद्र्य दुःख अपमानही प्राप्त झाले,
कारागृही सतत वास जरी मरे मी,
पूजीन ही सतत निर्भय मातृभूमी”
वामनराव दादांच्या विचारमंथनातून व लेखनशैलीतून अजरामर झालेले हे वाक्य त्यांनी आपल्या जीवनाची प्रतिज्ञा म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत जपले. आपल्या विचारांना लेखनापुरते मर्यादित न ठेवता आपल्या जीवनांत त्या विचारांना खऱ्या अर्थाने अंमलात आणणे हे वामनरावांचे वैशिष्ट्य होते. वामनराव दादांची स्वातंत्र्यासाठी बलिदानाची प्रतिज्ञा त्यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा करणारी ठरली.
कुशाग्र बुध्दी, बलदंड शरीर, व्यायामाची आवड, नेतृत्व, कर्तुत्व, भाषेवर प्रभुत्व, लेखन कला आणि ओतप्रोत देशप्रेम ह्या सगळ्या गुणांचे विस्तृत वर्णन अलंकारित भाषेत या चरित्रांत आले आहे. प्रत्येक मराठी माणसाने हे चरित्र वाचायला हवे. त्यांचे जीवन चरित्र आजच्या तरुण पिढीसाठी निश्चित प्रेरणादायक ठरेल. शालेय विद्यार्थांच्या अभ्यासक्रमांत अवांतर वाचन अंतर्गत त्याचा समावेश पुन्हा व्हायला हवा.
वामनराव दादांचे तत्त्वज्ञान व सुंदर हस्ताक्षर यामुळे लोकमान्य टिळक प्रभावित झाले होते. त्यांच्या पांडित्यावर टिळकांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे टिळकांनी त्यांच्या “गीतारहस्य” या ग्रंथाची मूळ हस्तलिखित वामनराव दादांच्या हाती सोपविली. वामनरावांनी तितक्याच जबाबदारीने या ग्रंथाची आपल्या सुवाच्च अक्षरांत मांडणी केली व ती प्रत मुद्रणासाठी सुपूर्त केली. लोकमान्य टिळकांनी “गीतारहस्य” या ग्रंथाच्या प्रस्तावनेत वामनराव दादांच्या या कार्याबद्दल नावासहित उल्लेख करून आभार प्रगट केले आहे. गुरूंनी केलेली प्रशंसा वामनराव दादांना राष्ट्रकार्यात स्फूर्ती देणारी ठरली.
“स्वराज्यासाठी शीलही भ्रष्ट झाले तरी तो राजधर्म आहे” अशा खड्या शब्दांत आपले मत स्पष्ट करत वामनराव दादांनी जहाल मताचा पुरस्कार करून स्वातंत्र्य लढ्याची पताका अखंडपणे टिकवून ठेवली.
वामनराव जोशी यांच्या संकल्पनेतून आदरणीय अंबादास वैद्य यांच्या पुढाकाराने अमरावती येथे “हनुमान क्लब” ची स्थापना झाली. त्याचा झालेला वटवृक्ष “हनुमान व्यायाम शाळा” नावाने आजही अमरावती शहरांत डोलतांना दिसतो.
भारत स्वतंत्र होऊन आपल्या नव्या पथचिन्हाकडे चालू लागला. वामनराव दादांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या कार्याचा मोर्चा स्थानिक सुधारणा घडवून आणण्याकडे वळविला. अमरावती नगर पालिकेचे अध्यक्ष म्हणून चोखपणे कारभार पाहू लागले. नगर पालिकेचा निधी हा सरकारी निधी आहे, त्यामुळे त्याचा योग्य वापर करावा. वैयक्तिक स्वार्थापोटी सत्तेचा दुरुपयोग केला जाऊ नये, याची वामनराव दादा विशेष दखल घेत असत. वामनराव दादांनी वयाच्या ७१ व्या वर्षी मध्य प्रदेशचे ( तेव्हा अमरावती मध्य प्रदेश व वऱ्हाड प्रांतांत होते.{सी.पी. आणि बेरार राज्य}) आमदारपद भूषविले. तेव्हाचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांनी वामनराव दादांना मंत्रिपद देण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु ही जबाबदारी त्यांनी नाकारली. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वामनरावांना बिहार चे राज्यपाल नेमण्याचे ठरविले, परंतु “मला कुठलेही मोठे पद नको” असे विधान करीत ती राज्यपाल पदाची जबाबदारी टाळली.
तरुण आणि तडफदार लेखकाने फार परिश्रमाने लिहिलेले लेखकाचे हे प्रथम पुस्तक होय. संदर्भ ग्रंथ सूची मध्ये दिलेल्या पंधरा व इतर संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून, प्रसंगी संबधित व्यक्तींना फोन करून त्यांना वामनराव दादांबद्दल माहिती विचारून व त्याचा संदर्भ शोधून तिचा या पुस्तकांत समावेश केला आहे. डॉ. अश्विनी घोंगडे यांचे उत्तम मार्गदर्शन यामुळे पुस्तकाची उंची निश्चित वाढली आहे.
महात्मा गांधी, स्वातंत्रवीर सावरकर व लोकमान्य टिळक या तीनही विचारधारांच्या सानिध्यात कार्य करून अष्टांग मार्गाने स्वातंत्र्य लढ्यांत आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या नरसिंहाच्या कार्याची साक्ष देणारे हे चरित्र वाचकांच्या पसंतीस नक्कीच पडेल यांत शंका नाही.
पुस्तकाचे नांव : वीरांचा बाणा
लेखक : श्री. श्रेयस राजेश कोल्हेकर
आवृत्ती: प्रथम, सन २०२२
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
पृष्ठे: १२३
किंमत: २२० रुपये
प्रदीप श्रीपाद जोशी
पुणे, महाराष्ट्र
फोन: ९४२३० ४३१७३
Influence of Migrations on Chitpavan Traditions
As Chitpavans started migrating outside Konkan in the early 18th century, they settled all over Bharat and now all over the world. The typical Chitpavan has predictable family traditions- a form of Mahadev as Kuldaivat from Konkan, Yogeshwari of Amba being worshipped as Kuldevi. We can see followers of Vaishnav deities like LakshmiNrusinh and LakshmiKeshav as another significant section. In lesser amounts we can observe Adityanath, Someshwar, etc and Vindhyawasini, Karanjeshwari, Keljai and so on. This information was retained through generations, including which deities are to be offered naivedya on important dates like Dev Diwali.
As Chitpavans moved out, some practices were forgotten and new deities were taken as Kuldevatas. Some of those who stayed in Pashchim Maharashtra took up Khandoba as Kuldaivat and started worshipping, adopting ‘Khandobache Navratra’ as an annual tradition.
Those who migrated after Raghuji Raje Bhonsale I via Vidarbha to Chhatisgarh, let go of their original kuldaivat and adopted Tirumala Tirupati Venkatesh Balaji as their deity, the family deity of the greater Deshastha population of the region. They too incorporated ‘Balaji cha Navratra’ as an annual tradition, with unique aratis and songs. Kuldevi was entirely forgotten. In most rare cases, gotra was forgotten as well.
In some families who moved to Jamkhandi and nearby areas, local deities like Kulhali Venkatesh were adopted and original deities like Vyadeshwar were forgotten.
Chitpavans carry the tradition to follow Hartalika (trutiya), and Bhadrapad Ganesh Chaturthi, for 1.5, 3, 5, 7, and 10 days. Those with 5 days usually have ‘Gauri-Ganpati’, where on the third day, Gauri (7 khade) are brought and worshipped. They stay for 2 days and on the fifth day first the Gauri (in Tulsi Vrundavan), then Ganpati idols are immersed in water bodies, marking completion of the festivities.
Some families have been performing unique rituals on Anant Chaturdashi. Although tradition instructs to perform Anant Chaturdashi Vrata only in difficult times and for fourteen years, some families have adopted it as an annual tradition.
In the Kannada region, where a significant Chitpavan population has been residing for a few centuries, Hartalika becomes Gauri Habba, where Devi Gauri is invoked through mantra chanting, and various gifts are offered. This is in contrast to Hartalika where Mahadev is the presiding deity. On both these days, rituals are performed by the women of the household.
Ashwin Navratra is also followed in many households (according to different inheritance laws of kulachar among males in previous generations). Ghatsthapana is performed, nandadeep and maal are kept. On Ashtami, the unique Mahalakshmi Vrata is performed. The face of the Mahalakshmi idol is made with rice dough and ‘Ghagar Phunkane’ (blowing in the earthen pot) takes place from evening till midnight on Ashtami.
Parshuram Jayanti is celebrated in some families. The tithi is Akshay Tritiya. This tradition is noticed scarcely.
All other important festivals and dates such as Narali Pournima, Nag Panchami, Ashadhi-Kartiki Ekadashi(s), Makar Sankrant, Dasara, Diwali and so on are celebrated by Chitpavans.
Bodan, although not among all Chitpavans, is present in many families according to previously existing traditions. More commonly on auspicious occasions, Bodan can be performed in any month of the year except the Chaturmas, Paush and Chaitra. There are different customs and rituals associated with Bodan with each family. The proverbial usage is ‘Bodan Bharane’.
An account from a person from Bihar proved to be extremely rare and unique. His gotra is Nityundan, and his ancestral memory included being of Maharashtrian Origin. His ancestors must have settled there during the Bengal-Maratha war-the invasions by Nagpurkar Bhonsales in Bengal, or the Third Battle of Panipat which happened ten years later. They now use the surname ‘Shankar’. No further information is known. They have forgotten all rituals and information about their ancestry and family. Similarly, there might be other families who have no ancestral memory of Chitpavan origins.
There is Chitpavan population in Gujarat in cities like Vadodara.
Significant population of Chitpavans is found in the Malwa region of Madhya Pradesh (north of the Vindhya Range). Indore is the residence of many Chitpavans. They moved to Indore initially with the Holkars and seem to have retained their identity and most of the kulachar and traditions. Some moved further north to Gwalior as well.
Conclusively, the influence of migration on Chitpavan traditions reveals a dynamic equilibrium between preservation and adaptation. While some families have retained their ancestral customs and deities, others have embraced new practices and symbols of devotion based on their local environments. This blend of tradition and adaptation has enabled the Chitpavan community to maintain its cultural identity while evolving alongside the changing landscapes of tradition they came across.
Akshaj Aniruddha Joshi
Nagpur, Maharashtra
Phone: 7972548582
तीर्थक्षेत्र कोल्हापूर
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील एक म्हणजे कोल्हापूर मधील महालक्ष्मी अंबाबाई. खूप लहान असताना महालक्ष्मी मंदिरात गेले होते, त्यानंतर फार वर्षांनी आज योग जुळून आला.
महालक्ष्मी मंदिर
महालक्ष्मी मंदिरात शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस आणि शनिवार, रविवार खूप गर्दी असते हे माहीत होते म्हणून ते दिवस टाळूनच दर्शनाचा दिवस निवडला. महाद्वारातून आत जाताच संपूर्णपणे दगडी बांधकाम असलेले हे अत्यंत प्राचीन देऊळ नजरेस पडले. या देवळातील देवीची मूर्ती पाषाणाची असून जवळपास 3 फुट उंचीची आहे. तिच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आहे. देवळाच्या खांबांवर कोरीव काम केलेले आहे. तसेच आतील आणि बाहेरील भागात दगडावर अनेक शिल्पे कोरली आहेत. महालक्ष्मी बरोबरच तेथे महाकाली, महासरस्वती , गणेश, विष्णू अशी अनेक मंदिरे आहेत.
मंदिर पश्चिमाभिमुख आहे आणि वर्षातून दोन वेळा येथे किरणोत्सव होतो. म्हणजेच देवीच्या मूर्तीवर संध्याकाळी थेट सूर्याची किरणे पडतात. याप्रकारची रचना असलेले हे देऊळ म्हणजे आपल्या प्रगत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे दक्षिणेतील अनेक लोकसुद्धा देवीच्या दर्शनासाठी येतात. आम्ही सकाळी लवकरच देवीच्या दर्शनाला गेलो. गुरुजींच्या कृपेने अत्यंत शांतपणे आणि उत्तम दर्शन झाले. देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले.
देवळाच्या बाहेरच कोल्हापुरी साज, ठुशी,वज्रटीक यासारख्या मराठमोळ्या दागिन्यांची दुकाने आहेत. तसेच थालीपीठ, अप्पे यासारखे पदार्थही उत्तम मिळतात. कोल्हापुरी चपला , कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी मसाले यासाठीही कोल्हापूर प्रसिद्ध आहे.
नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी
देवीच्या दर्शनानंतर नरसोबाची वाडी येथे जायचे ठरले. नरसोबाची वाडी हे कोल्हापूर पासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले दत्तगुरूंचे मंदिर आहे. प्रायव्हेट गाडी करून नरसोबाच्या वाडीला पोचलो. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेले नृसिंहवाडी हे दत्तगुरूंचे एक जागृत देवस्थान आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे या ठिकाणी १२ वर्षे वास्तव्य होते त्यामुळेच त्याला नृसिंह वाडी असे नाव पडले.
या देवळात दत्तगुरूंची मूर्ती नसून त्यांच्या पादुका आहेत. विजापूरच्या आदिलशहाच्या मुलीला दत्तगुरूंच्या कृपेने दृष्टी आली त्यामुळे त्याने हे मंदिर बांधून दिले. याच कारणामुळे या देवळाला इतर मंदिरांप्रमाणे कळस नाही. अथांग पसरलेल्या कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमाला नमस्कार करून आम्ही पादुकांचे दर्शन घेतले. वाडीला गेल्यावर तिथली बासुंदी खाणे मस्टच…मग वाडीची सुप्रसिद्ध बासुंदी खाल्ली. मऊ मुलायम दाटसर बासुंदीची चव नंतर कितीतरी वेळ जिभेवर रेंगाळत होती. कंदी पेढे, कुंदा अशी भरपूर खरेदी केली. सोमण भोजनालयात घरगुती आणि उत्तम चवीचे भरपेट जेवण केले आणि तेथून निघालो.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर
या पुढच्या टप्पा होता खिद्रापूरचे शिवमंदिर. हे मंदिर कोल्हापूर पासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर आहे. पाषाणावर कोरीव काम असलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. बाहेरून पाहिले असता या मंदिराची रचना अर्धगोलाकार दिसते. मंदिराच्या आत शिरताच गोलाकार स्वर्ग मंडप आहे. स्वर्ग मंडपाची रचना अद्भूत अशीच आहे. त्याला 240 खांब आहेत आणि प्रत्येक खांबावर कोरीव काम केलेले आहे. वरच्या बाजूला गोलाकार गवाक्ष आहे. मंदिराच्या आतील सभामंडपातही अनेक शिल्पे कोरली आहेत. यातील काही आज भग्न स्थितीत आहेत. दगडी बांधकामामुळे या मंदिराच्या आत गारवा असतो. या मंदिरात कट्यार काळजात घुसली या सिनेमाचे शूटिंग झाले असे आमच्या ड्रायव्हरने सांगितले. शिवपिंडीचे दर्शन घेऊन आणि या मंदिराचे सौंदर्य डोळ्यात साठवून हॉटेलला परतलो.
ज्योतिबा मंदिर
दुसऱ्या दिवशी ज्योतिबा मंदिर आणि पन्हाळा करायचा ठरवले. ज्याप्रमाणे जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर पिवळ्या रंगाच्या भंडाऱ्यात नाहून निघालेले असते त्याप्रमाणेच ज्योतिबा मंदिर गुलालाची उधळण केल्यामुळे गुलाबी झालेले होते. या मंदिरात नंदीच्या दोन मूर्ती आहेत. मंदिरात जास्त गर्दी नव्हती त्यामुळे लवकर दर्शन झाले. अनेक नवपरिणीत जोडपी ज्योतिबाच्या दर्शनाला आली होती. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे गोंधळही या मंदिरात होतात असे कळले. चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा असते. गुरुजींनी कपाळाला गुलाल लावल्यामुळे कपाळाभर गुलाल माखून आम्ही तिथून निघालो.
पन्हाळा किल्ला
यानंतरचे ठिकाण होते ते म्हणजे शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा पन्हाळा किल्ला.
पन्हाळा किल्ल्याचा मुख्य दरवाजा ढासळला आहे तेथे कालांतराने रस्ता बांधला आहे त्यामुळे तेथून रस्त्याने गाडीतून थेट किल्ल्यावर जाता येते. गाईडच्या मदतीने संपूर्ण किल्ला पाहिला. सज्जा कोठी, अवाढव्य असे धान्याचे कोठार किंवा अम्बरखाना, दुतोंडी बुरुज अशी अनेक ठिकाणे पाहता आली. मग पाहिली महाराज ज्या वाटेवरून पन्हाळगडावरून विशाळगडावर गेले ती पायवाट. याच वाटेवर बाजीप्रभूने लढवलेली घोडखिंड आहे. किल्ल्याबाहेरच बाजीप्रभूंच्या शौर्याची आठवण करून देणारा त्यांचा पुतळा आहे. गडावर शिवाजी महाराजांचे छोटेखानी मंदिर आहे. दुसऱ्या दिवशी शिवजयंती असल्यामुळे हे मंदिर फुलांनी सजवले होते. साधारणपणे हे मंदिर नेहमी बंदच असते. पण आमच्या सुदैवाने त्यावेळी मंदिर उघडे होते आणि आम्हाला महाराजांचे दर्शन घेता आले. नंतर गडावर पिठले भाकरी खाऊन परतीच्या प्रवासाला लागलो.
अस्मिता सतीश भिडे
ठाणे, महाराष्ट्र
फोन: ९९६७०५८४७२
कल्पोत्तरें
सध्या आसपास सर्वत्र प्रश्नांचीच चर्चा होताना दिसते. फार फार तर काही चांगले घडण्याची इच्छाही व्यक्त होताना दिसते. पण उपाय फारसे पुढे येत नाहीत. उदाहरणार्थ रोजगार. रोजगाराचा प्रश्न ज्वलंत आहे एवढेच सतत ऐकू येते. त्याला उत्तर म्हणून नवीन उद्योगधंदे येण्याबद्दलच बोलले जाते.
निदान आपण फक्त प्रश्नांबद्दल न बोलता उत्तरांचा विचार केला पाहिजे. म्हणूनच बऱ्याचशा कल्पना आणि काही प्रश्नांची उत्तरे मिळून श्री. भरत दातार (पुणे) यांच्या लेखणीतून काल्पोत्तरें हा अंक साकारला आहे.
भरत दातार Oracle ERP Finance Consultant आहेत. तीन दशकांहून जास्त काळ Business Application मधले प्राब्लेम सोडवत असल्याने कदाचित भोवतालच्या प्रश्नांची उत्तरे भरत सतत शोधत असतात. असेच काही लेख कल्पोत्तरे दिवाळी अंकात वाचायला मिळतील.आपण सर्वांनी फक्त प्रश्न न उगाळता उत्तरांचा जास्त विचार करावा एवढीच अपेक्षा आहे.
या दिवाळी अंकाच्या २०० प्रती छापून श्री. भरत यांनी विनामूल्य वितरित केल्या आहेत.
चित्पावन कनेक्ट च्या वाचकांसाठी त्यांनी या अंकाची लिंक देण्यासाठी परवानगी दिली आहे. यातील लेख नक्कीच तुमचा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतील.
भरत दातार
पुणे, महाराष्ट्र
फोन: 9881166505
Staircase Climbing Wheelchair
Staircases are present in almost every man-made structure. Many old buildings do not have elevators fitted thereto. The task of climbing stairs is a major challenge for differently abled people or for the elderly, due to impaired mobility that is already present or comes with age. In buildings that are equipped with elevators, power backup facility may fail for certain reasons and if an emergency arises in the same span, climbing up or down the stairs will not be convenient or benefitting.
Carrying heavy loads to upper levels is a difficult task even for a normal person living in the old and high buildings in which elevators are temporarily or permanently not available. Hence ‘Staircase Climbing Wheelchair’ is a need of the day.
The present products which are available to cater this need are not at all cost-effective. This invention provides a new, innovative, simple yet ‘affordable’ design of ‘Staircase Climbing Wheelchair’, which can also be extended later into a material transfer trolley.
The product developed herein uses specially designed wheels corresponding with the steps of the target staircase. Combination of steps of staircase is treated as a ‘Rack’ (straight/flat gear). Shape of matching wheels is obtained by using ‘Gear Generation’ principle.
Well-known method of ‘Rack Shift’ is used to ‘Generate’ the wheel profile. Wheels behave like a ‘Pinion Gear’, perfectly conjugate to (corresponding to) the staircase ‘Rack.’ Overall design of the wheelchair is very simple.
Apparently, it looks like a normal wheelchair but is fitted with chargeable battery, BLDC motor, worm gearbox, chain-sprocket positive drive etc, all hidden under the seat. Two conjugate wheels, designed as per the innovative concept explained above, are fitted onto the power-shaft and are driven via positive transmission.
The person willing to move on the stairs sits on the chair facing downside. Attendant also faces downside from behind the wheelchair, holds the handles and slightly tilts the chair so that the special wheels engage with the steps. He/she puts on the DPDT electric switch in forward /reverse position to move the chair up/down and he/she navigates the wheelchair. It is useful for specific building because the design of wheels is based on the step parameters of particular staircase. Hence the configuration is to be used as an accessory of the building, and it is to be used in case of total or temporary unavailability of elevators.
Initially a reduced scale model was developed to verify that it works as per prediction. Full scale four wheeled working chassis is then developed as an intermediate step. Finally, the transmission system is absorbed inside the wheelchair, to arrive at an elegant working candidate product.
This PATENTED and well recognized candidate product will help the society by providing simple, economical and customized ‘Staircase Climbing Wheelchair/Trolley’ with better maneuverability. It is characterized with substantial societal benefits like capability of saving lives in crucial times, solution to a genuine problem, simplicity in construction and service, low cost etc.
Dr. Girish S. Modak
(M.E. Mech – Design Engineering), Ph. D. (Mechanical Engineering)
Professor, Department of Mechanical Engineering
Pune, Maharashtra
Phone: 7972410310
उठा उठा . .
उठा उठा ब्राह्मण तरुणांनो, ब्राह्म तेज दाखवा
आता नाही तर कधीच नाही, हे आता ओळखा
भ्रष्टाचारा निपटून टाकू, अशी प्रतिज्ञा करा
मदत करूनी दिन दुबळ्यांना, सेवाव्रतास आचरा
स्वच्छ ठेऊनी चारित्र्याला,आदर्श अपुला ठेवा ||१||
व्यसनांपासून दूर राहूनी, विनाश आपुला टाळा
शिक्षण घेऊनी उच्च पदावर, काम नेटके करा
लोभ मोह टाळुनी आचरण, शुद्ध आपुले ठेवा ||२||
योग आयुर्वेदाने सारे, विश्व निरोगी बनवा
भारतीय संस्कृती आपुली, सर्व जगी पोहोचवा
गायन वादन नृत्यामधूनी, वैश्विक ऊर्जा मिळवा ||३||
पर्यावरणा जपा,झाडे लावा झाडे जगवा
नैसर्गिक ऊर्जेचा वापर, कसा करावा शिकवा
प्राथमिक गरजा साऱ्यांच्या, प्रयत्नपूर्वक पुरवा ||४||
आळस सोडुनी उत्साहाने, करा राष्ट्रसेवा
सत्कृत्यांची गुढी उभारून,दुष्कृत्यांना मिटवा
साऱ्या जगात भारतास या, पूजनीय बनवा ||५||
किरण फाटक
डोंबिवली, महाराष्ट्र
फोन: 9819531904
The Future of AI: How Artificial Intelligence Will Shape Our World
Artificial intelligence (AI) is already an essential part of modern life and is set to become even more influential in the future. As AI technology advances, it will impact nearly every sector of society, offering benefits such as increased efficiency, improved decision-making, and more personalized services. From healthcare to transportation, AI will transform how we live and work.
AI: Convenience Turned Necessity
AI is already present in our lives through devices like Siri, Alexa, and personalized recommendations on platforms like Netflix or Amazon. These systems use vast amounts of data to improve accuracy over time, learning from user behaviour and predicting preferences.
In the future, AI will evolve from a mere convenience to a necessity. Smart homes powered by AI could manage daily tasks like controlling lighting, temperature, and energy use, while wearables might monitor health conditions in real-time. These advancements will simplify everyday life, making AI a necessity.
Healthcare: Personalized Treatment and Advanced Diagnostics
AI’s most significant future impact may be in healthcare. AI systems are already used to detect diseases like cancer and predict patient outcomes. As the technology advances, AI will enable ‘personalized medicine’ by analysing genetics, lifestyle, and medical history to recommend more effective treatments.
AI-powered diagnostic tools will also improve healthcare accessibility, particularly in remote areas with limited medical professionals. These tools could diagnose conditions and recommend treatments, revolutionizing healthcare delivery and ensuring better patient outcomes worldwide.
Education: Adaptive Learning and Virtual Assistants
AI is set to transform education through personalized learning platforms. These AI-powered systems adapt to students’ individual learning needs, allowing them to progress at their own pace. In the future, adaptive learning environments will provide customized curriculum, catering to each student’s strengths and weaknesses.
Teachers will benefit from AI automation in administrative tasks like grading and progress tracking, giving them more time to focus on individualized instruction. AI could also provide virtual tutors to offer real-time feedback, enhancing the learning experience and helping students grasp challenging concepts.
Lifelong learning will become more accessible with AI-powered professional training programs that cater to the evolving demands of the job market. This flexibility will make education more relevant and adaptable to future needs and trends.
Transportation: Autonomous Vehicles and Logistics
One of the most prominent uses of AI is in self-driving cars, which are already available in the market. These vehicles rely on AI to process sensor data, navigate roads, and make real-time decisions. Fully autonomous cars could significantly reduce traffic accidents caused by human error, traffic and road conditions and make transportation safer.
Beyond personal vehicles, AI will revolutionize logistics, with autonomous drones and AI-driven systems managing supply chains and improving delivery speed and accuracy. In agriculture, AI-powered machines will monitor crops and automate harvesting, helping to boost productivity while reducing waste.
Ethical Challenges and Job Displacement
As AI becomes more prevalent, it raises ethical concerns, particularly around bias in AI systems. Since AI learns from historical data, it can inherit biases that lead to unfair outcomes, such as in hiring practices or criminal justice decisions. Ensuring transparency, fairness, and accountability in AI development is crucial to avoid negative results for humans in the future.
Another significant concern is job displacement due to automation. Many tasks, particularly in industries like transportation and customer service, could be taken over by AI systems. However, AI will also create new job opportunities in AI development, maintenance, and data management, as well as in emerging fields. The challenge will be helping workers transition to these new roles through reskilling and education.
The Path Forward: AI’s Role in Shaping the Future
Looking ahead, AI has the potential to improve lives and create a more efficient, personalized, and connected world. The challenge lies in harnessing AI’s potential responsibly while ensuring that its benefits are shared across all levels of society. Using human intelligence to boost AI advancements at desired levels is important in order to ensure positive reinforcement from AI products.
Sarwesh Soman
Nagpur, Maharashtra
Phone: 7588274650
विविध चित्पावन संघ आणि प्रतिष्ठानांद्वारे प्रकाशित केले जाणारे अंक
हितगुज – मराठे प्रतिष्ठान
मराठे प्रतिष्ठान द्वारे हितगुज हे मुखपत्र अनेक वर्षांपासून प्रकाशित केलं जातं. मार्च २०२५ मध्ये १४१ वा अंक हल्लीच प्रकाशित करण्यात आला.
संपादिका: अंजली आशुतोष मराठे
ईमेल: marathea70@gmail.com
अंकाच्या संपादिका, प्रतिष्ठान चे कार्यवाह श्री. हेमंत मराठे आणि मराठे प्रतिष्ठान कार्यकारी मंडळ यांचे आम्ही आभारी आहोत कारण चित्पावन कनेक्ट च्या वाचकांसाठी हितगुज अंकाची लिंक देण्याची त्यांनी परवानगी दिली आहे.
कर्वे वार्तापत्र – कर्वे कुलसमिती
कर्वे कुलसमिती द्वारे कर्वे वार्तापत्र हा अंक प्रकाशित केला जातो. मार्च २०२५ मध्ये ५८ वा अंक हल्लीच प्रकाशित करण्यात आला.
संपादिका: सौ. प्राची दिनेश कर्वे – पुणे
ईमेल: karvekulsamiti@gmail.com
अंकाच्या संपादिका आणि कर्वे कुलसमिती कार्यकारी मंडळ यांचे आम्ही आभारी आहोत कारण चित्पावन कनेक्ट च्या वाचकांसाठी कर्वे वार्तापत्र ची लिंक देण्याची त्यांनी परवानगी दिली आहे.
कर्वे वार्तापत्र – मार्च २०२५ चा अंक वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भावे-प्रयोग – भावे मित्र मंडळ
भावे मित्र मंडळा द्वारे भावे-प्रयोग हे द्वैमासिक प्रकाशित केलं जातं. मार्च २०२५ चा अंक हल्लीच प्रकाशित करण्यात आला.
संपादक: श्री. अभय शंकर भावे
फोन: ९४२२३०६०३३
अंकाचे संपादक आणि भावे मित्रमंडळ कार्यकारी मंडळ यांचे आम्ही आभारी आहोत कारण चित्पावन कनेक्ट च्या वाचकांसाठी भावे-प्रयोग ची लिंक देण्याची त्यांनी परवानगी दिली आहे.
केतकी – केतकर व जोशी (गार्ग्य गोत्री) परिवाराचे मुखपत्र
केतकर व जोशी (गार्ग्य गोत्री) परिवारा द्वारे केतकी हे मुखपत्र केलं जातं. मार्च २०२५ चा अंक ३० मार्च ला प्रकाशित करण्यात आला.
संपादक: श्री. विजय केतकर
फोन: ९७६७०७५८१०
ईमेल: ketkarkul.committee@gmail.com
अंकाचे संपादक श्री. विजय केतकर, सचिव श्री. मुकुंद केतकर आणि केतकर व जोशी (गार्ग्य गोत्री) परिवार कार्यकारी मंडळ यांचे आम्ही आभारी आहोत कारण चित्पावन कनेक्ट च्या वाचकांसाठी केतकी अंकाची लिंक देण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे.
केतकी – मार्च २०२५ चा अंक वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बेरोजगारी सोडवणे आणि स्वयंरोजाराला वाव देण्याबाबत उपाय
मराठी तरुण हा नेहमी काहीतरी वेगळे, उच्च, शुद्ध व सर्वांना उपयोगी होईल असे करीत असलेला आहे.
परंतु, गेल्या काही दशकात, आपल्या राज्यातील अनेक मंडळी नैराश्याने ग्रासली गेली आहेत, बेरोजगारी, समाजात मान न मिळणे, दुर्लक्ष केले जाणे, फसवणूक, कुवती पेक्षा कमी पगार व पद मिळणे, बाहेरून लोकांनी इथे येऊन पुढे जाणे, ही काही उदाहरणे आहेत.
गावाकडील तरुण मंडळीत, बेरोजगारी व रस्ता न दिसणे, या समस्या प्रकर्षाने आहेत.
मी आपणास, या वर उपाय कोणते आहेत, ते लिहीत आहे.
सर्व युवकांनी, Employment News या साप्ताहिक सरकारी वृत्तपत्राचे, सॉफ्ट कॉपी वर्गणीदार व्हावे. या मध्ये, भारतातील सर्व सरकारी खाती, बँका, UPSC, सुरक्षा दले, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कंपन्या, वैमानिक, Merchant Navy, सरकारी शैक्षणिक संस्था, जसे IIM, IIT, यांच्या प्रवेश प्रक्रिया, अशा अनेक संस्थांच्या नोकर भरतीच्या तथा विद्यार्थी प्रवेशाच्या जाहिराती असतात.
परदेशी शिष्य-वृत्त्या, चाचणी प्रवेश परीक्षाचे नमुने, राष्ट्रीय पातळीवर निवडले गेलेल्या यशस्वी तरुणांचे मार्गदर्शन, असे सर्व असते.
आपल्या निम शहरी भागातील नातेवाईकांना या संधींची माहिती आहे का?
उदाहरणार्थ, १२वी शास्त्र नंतर जर आपला मुलगा, Coast Guard किंवा भारतीय नौसेनेत निवडला गेला, तर त्यास, त्यांच्या खर्चाने, B.E. केले जाते, अशा स्वरूपाच्या संधी असतात, हे आपणास ठाऊक आहे का?
तेंव्हा, उगाच रडण्यात, किंवा आमच्यावर अन्याय होतो, असे करू नये. ते आपल्यासाठी नाही. या दुःखाचे कारण, अशा लोकांचे, अज्ञान, हे आहे.
आपल्यातील, अती हुशार विद्यार्थीनी IIM, IIT मध्ये निवड होऊन जावे. तिथे आपली मंडळी, नगण्य पेक्षा कमी आहेत. ही त्रुटी भरून काढण्याच्या प्रयत्नात अनेकांना रोजगार मिळेल. सर्वांना आयएएस व तत्सम, होता येणार नाही, पण त्या खालती किती तरी नोकऱ्या असतात.
हिंजवडी आमच्या मुळे चालते, हे ऐकायला छान वाटते, पण, तेथील कंपन्यांमध्ये, अधिकारी किंवा व्यवस्थापक किंवा भारतीय उपाध्यक्ष या पदावर आपली किती मंडळी आहेत?
पूर्वी निम्न स्थर सरकारी नोकऱ्या, ओळखीवर मिळायच्या. पण १९७५ नंतर, Staff Selection Commission आले, ज्याची माहिती आपल्या रय्यातील लोकांनी करून घेतली नाही, गाफील राहिले, आमचे आश्वासने देणारे नेते, आमच्या गावात मोठे सरकारी प्रोजेक्ट्स आणतील, असे समजले, व आजही अशी माहिती बहुतेकांना नाही. किंवा, आपली बदली दूर कुठे तरी होईल, हा, विचार बळावला आणि आपलेच नुकसान झाले. Employment News वाचल्यावर, आपला दृष्टीकोन विशाल होईल, आपल्याच शहरात कोणत्या मोठ्या सरकारी आस्थापना आहेत आणि तिथे इतर प्रांतीय नोकरी करीत आहेत, याची डोळे उघडून माहिती होईल !
म्हणून मी Employment News चा प्रचार करतो. ही , यशाची केवळ सुरुवात आहे.
इथे मी असा सल्ला देईन की समजा, रेल्वेच्या किंवा बँकेच्या, लखनौ विभागाने जरी जाहिरात दिली, तरी, आपण ती परीक्षा द्यावी. आपल्याला काही उद्या कामावर या असे सांगणार नाहीत. दुहेरी फायदा असा आहे की या सर्व परीक्षांचे एक केंद्र मुंबई , नागपूर , असे असते , आणि सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षा, साधारण सारख्याच असतात.
मुलाखतीचा मौल्यवान अनुभव आपोआप मिळतो. पण एकदा का अर्ज करायची संधी निघून गेली, की आपण वय बाद कडे सरकत असतो.
मराठी युवकांचे प्रमाण या उच्च क्षेत्रात अशा रीतीने सहज वाढवता येईल.
उपाय:
आपले शिक्षण व वय, ज्या सर्व स्पर्धा परीक्षा द्यायला पात्र आहेत, त्या सर्व द्याव्यात, त्यातून , आपला आत्मविश्वास वाढेल व खरे मोठे नोकरीचे पद घेण्यास, जे कर्तृत्ववान तरुणांना शोभेल, ते कोणते ? ते कळेल आणि आपण ते सहज जिंकू शकू.
आज महाराष्ट्र बैंक, आपली राहिली नाही, याचे कारण, स्पर्धात्मक परीक्षांकडे केलेले दुर्लक्ष आहे.
सुदैवाने व त्यांच्या कष्टाने, आपल्यातील किती तरी तरुण, आज परदेशात चांगल्या पदांवर नोकरीस आहेत, त्यांचे कौतुक आहेच, पण सर्वांची क्षमता व ऐपंत तेवढी नसते तरी पण, त्यांना हे सर्व खूप पर्याय आहेत.
मुलींसाठी, Bank Probationary Officer हा उत्तम पर्याय आहे. तसेच, Company Secretary (Compliance Officer साठी).
गाव असो शहर, सर्व युवकांनी आपण, CA, ICWA, CS, यांच्या वेब साईट्स तपासाव्यात. याचा लाभ असा की, वरील तीन परीक्षा या अती हुशार युवकांसाठी असतात, पण त्यापेक्षा कमी क्षमता असलेल्या युवकांसाठी, या संस्थांनी अनेक छोटे पण उच्च दर्जाचे, उपयुक्त व वेळप्रसंगी CA. सुद्धा ज्यांची मदत घेतात, असे कोर्सेस ठेवलेले आहेत. त्यात बुद्धी कौशल्य लागतेच लागते तसेच त्याना सरकारी मान्यताही आहे, Certifying Authority चा दर्जा आहे. मागणी आहे. अशाच प्रकारचे शॉर्ट टर्म, सरकारमान्य, – High Value Courses, सरकारी संस्था चालवतात, जसे, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, TISS, इत्यादी. ज्याची बुद्धी ज्यात चालते, त्यात Web Sites वर शोधा म्हणजे मार्ग प्रकाश दिसेल.
खासगी नोकऱ्यांचे पहाल तर, विक्री कामात खूप संख्येने नोकन्या असतात, शिक्षणाची व अनुभवाच्या अटी, शिथिल असतात.
शहरी भागात, पांढरपेशा स्वयंरोजगार म्हणजे इंटेरियर डेकोरेशन. त्याचे course न करता सुद्धा, हाता खाली काम करून, या कामात मोठे होता येते.
कितीतरी छोटे कोर्सेस, सरकारचे काही विभाग करीत असतात, जसे प्रमोद महाजन कौशल्य विकास, जिल्हा उद्योग केंद्र, ITI, सरकार मान्य अभ्यासक्रम केला की सरकारी योजनांचे कर्ज किंवा लाभार्थी होणे थोडे सोपे होते. या सर्वांच्या web sites आहेत.
तूर्तास इथे थांबतो. सुझाव व टीका, या दोघांचे स्वागत आहे. मी माझ्या अभ्यासाने असे मार्गदर्शन, गैरसमज दूर करणे, हे करीत असतो.
मी नोकरी लाऊन देणारा एजेंट अथवा placement office नाहीये.
संधी भरपूर आहेत, पण शोधले कि सापडते हेच खरे.
कोणत्या व किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, याची चांगल्या पैकी माहिती हाती नसलेल्यानी, हल्ली पूर्वी सारख्या कुठेच नोकऱ्या नाहीत, सगळीकडे बेरोजगारी मजली आहे, सरकार काय करताय ? असे म्हणून स्वतःची वाट लावू नये.
राघवेंद्र कोल्हटकर
ठाणे, महाराष्ट्र
ईमेल: rdkolhatkar@yahoo.com
Career Corner
In this Section, you will find the details of Job Opportunities where Chitpavan Fellow Members can refer you for the job.
To know more about the Job Opportunities, please contact us via WhatsApp on +91 9920345861. Further information will be shared only after due diligence about your profile.
Job Titles –
Engineer – Firmware Engineering
Principal Software Engineer (Java)
Manager – Automation
Application Engineering Manager
Plant Finance Controller
Low Code Apps Developer
The above-mentioned openings are in Pune / Mumbai.
You can send Resume on info@ganpulefoundation.org so that we can connect with you in case we come across relevant job openings.
Instructions to Submit Literature
If you wish to submit literature for Chitpavan Connect, please send us your previously not published literature on the topics mentioned in advert.
